सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव…
भारतीय बाजारपेठेत सोमवारी (22 मार्च) सोन्याच्या किंमतीत सलग तिसऱ्या दिवशी (Today 22nd March 2021 Gold Rate) घसरण झाली आहे.
मुंबई : भारतीय बाजारपेठेत सोमवारी (22 मार्च) सोन्याच्या किंमतीत सलग तिसऱ्या दिवशी (Today 22nd March 2021 Gold Rate) घसरण झाली आहे. पिवळ्या धातूच्या किंमतीत 100 ग्रॅममागे 100 रुपयांची घसरण झाली आहे. सोमवारी 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 4,39,200 रुपये आहे. तर 24 कॅरेटच्या 100 ग्रॅम सोन्याची किंमत 4,49,200 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 43,920 रुपये, तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 44,920 रुपये आहे (Today 22nd March 2021 Gold Rate Gold Price Fall On Third Day).
राज्ये आणि शहरांमध्ये करांच्या रचनेमुळे सोन्याचे दर बदलतात. गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ही चांगली वेळ आहे.
देशातील कुठल्या शहरात सोन्याचा भाव काय?
नवी दिल्ली – 48,390 रुपये प्रति 10 ग्राम
मुंबई – 43,920 रुपये प्रति 10 ग्राम
चेन्नई – 42,490 रुपये प्रति 10 ग्राम
कोलकाता – 44,500 रुपये प्रति 10 ग्राम
बंगळुरु – 42,240 रुपये प्रति 10 ग्राम
हैद्राबाद – 42,240 रुपये प्रति 10 ग्राम
केरळ – 42, 240 रुपये प्रति 10 ग्राम
वडोदरा – 44,370 रुपये प्रति 10 ग्राम
अहमदाबाद – 44,370 रुपये प्रति 10 ग्राम
राज्यातील शहरात सोन्याचा दर काय?
पुणे – 43,920 रुपये प्रति 10 ग्राम
कोल्हापूर – 45,428 रुपये प्रति 10 ग्राम
नागपूर – 44,910 रुपये प्रति 10 ग्राम
नाशिक – 44,910 रुपये प्रति 10 ग्राम
जळगाव – 45,433 रुपये प्रति 10 ग्राम
औरंगाबाद – 45,455 रुपये प्रति 10 ग्राम
Social Plugin