Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

विद्यार्थ्यांभोवती वाढतोय कोरोनाचा विळखा

 


अर्जुनी मोरगाव : शाळाशाळांत कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्या होऊ लागताच आता विद्यार्थी पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. तालुक्यातील दोन शाळांतील चार विद्यार्थी पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. यामुळे पालकवर्ग चिंतित आहे.


गोंदिया जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत शाळा सुरू होत्या. दरम्यान जिल्हा प्रशासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचण्या करण्याचे निर्देश दिले होते. अनेक शाळांत चाचण्या होऊ लागल्या. यात काही विद्यार्थी पॉझिटिव्ह आले. ३१ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी काढले. त्यानुसार शनिवारपासून शाळा बंद झाल्या. मात्र विद्यार्थ्यांच्या चाचण्या सुरूच आहेत. शनिवारी आरटीपीसीआर तपासणी किट उपलब्ध नसल्याने चाचण्या होऊ शकल्या नाहीत. मात्र तत्पूर्वी दोन शाळांत चार विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 


किटअभावी अनेक शाळांतील विद्यार्थ्यांच्या अद्याप चाचण्या पूर्ण झाल्या नाहीत. आणखी यात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासन कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी घेत असले तरी अद्याप महाविद्यालय व खासगी शिकवणी वर्ग सुरूच आहेत. काही शिक्षक स्वतःच्या घरी शिकवणी वर्ग चालवित असल्याचे समजते. अशा गैरप्रकारांतून छुप्या पद्धतीने कोरोनाच्या संसर्गवाढीला आमंत्रण दिले जात आहे. खुल्या शिकवणी वर्गांऐवजी ऑनलाइन शिकवणी वर्ग हा यावर पर्याय उपलब्ध असताना शिक्षक गैरमार्गाचा अवलंब करीत असल्याचे दिसून येत आहे






मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यातच आता कोरोनाने शाळांमध्येसुद्धा शिरकाव केला आहे. दोन दिवसांच्या कालावधीत १७ विद्यार्थी आणि ११ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांभोवती कोरोनाचा विळखा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 


सद्य:स्थितीत इयत्ता पाचवीपर्यंतच्या शाळा सुरू आहेत. शाळा सुरू होऊन आता जवळपास पाच महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. मागील तीन महिन्यांत जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाला होता. त्यामुळे पालकसुद्धा आपल्या पाल्यांना शाळांमध्ये पाठवित होेते. मात्र महिन्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. याच अनुषंगाने आता शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. याच चाचणीदरम्यान गुरुवार आणि शुक्रवारी जिल्ह्यात एकूण १७ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले तर ११ शिक्षकांनासुद्धा कोरोनाची लागण झाल्याची बाब पुढे आली आहे. 


शुक्रवारी सालेकसा, अर्जुनी मोरगाव, देवरी, सडक अर्जुनी आणि गोंदिया तालुक्यातील प्रत्येकी एक विद्यार्थी कोरोनाबाधित आढळला. त्यामुळे शाळांकडूनसुद्धा दक्षता बाळगली जात आहे. दरम्यान, शाळांमध्ये कोरोनाचा विळखा वाढल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. हीच बाब ओळखून शिक्षण विभागानेसुद्धा किमान १५ दिवस शाळा बंद ठेवण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे.


Ad Code

Responsive Advertisement