पुणे विद्यापीठाच्या तारखा ठरल्या, लगबग झाली, विद्यार्थ्यांनो परीक्षा देण्याची वेळ आली…!
विद्यार्थ्यांची गुणवत्ता, गैरप्रकारांना रोखणे, विद्यार्थ्यांची सोय यावर चर्चा करुन परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे. परीक्षा देताना विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणींशिवाय ही परीक्षा देता यावी, यासाठी उपापयोजना करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं विदयापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
कधी होणार परीक्षा?
पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या प्रथम सत्राची परीक्षा 15 मार्चपासून ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. द्वितीय वर्ष ते अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 15 मार्चपासून सुरु होईल. गुणवत्ता, गैरप्रकारांना रोखणे, विद्यार्थ्यांची सोय यावर चर्चा करुन परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे.
कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसह अंतिम वर्षाच्या बॅकलॉकच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन आणि प्रॉक्टर्ड पद्धतीने घेतली. ऑनलाईन परीक्षा घेतल्याने वेळेची बचत होणार आहे. तसंच निकालाला देखील वेळ लागणार नाही. अगदी महिन्याभरात मुलांच्या हाती निकालपत्र भेटू शकते.
मार्च महिन्यांत ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 15 ते 20 मार्च या कालावधीत तर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 30 मार्चपासून घ्यावी, असं एकंदरित मत या बैठकीत मांडलं गेलं आहे, असं विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय चाकणे यांनी सांगितलं.
Social Plugin