ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास...
ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. चेंबूर येथील इंलॅक्स इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुंबई- ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. चेंबूर येथील इंलॅक्स इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रणधीर कपूर यांनी भावाला तातडीने जवळच्या इस्पितळात भरती केलं, पण उपचार सुरू करण्यापूर्वीच राजीव कपूर यांचं निधन झालं होतं.
रणधीर यांनी स्वतः राजीव यांचं निधन झाल्याचं सांगितलं. भावाच्या निधनाबद्दल रणधीर म्हणाले की, 'आज मी माझा छोटा भाऊ राजीवला गमावलं. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण त्याचे प्राण वाचवू शकले नाही. पुढील सर्व कामांसाठी आता मी इस्पितळातच आहे.'
राजीव, रणधीर कपूर आणि ऋषी कपूर या तीन भावांमध्ये राजीव कपूर सर्वात धाकटे बंधू होते. त्यांचा जन्म 25 ऑगस्ट 1962 रोजी झाला होता. वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना त्यांनी 2001 साली आरती सबरवालशी लग्न केले. 2003 मध्ये या दोघांचे घटस्फोट झाला.
राजीव कपूर यांना वडिलांच्या राम तेरी गंगा मैली चित्रपटातून ओळख मिळाली. या चित्रपटात त्यांच्या अपोझिट मंदाकिनी होती. राजीवची अभिनय कारकीर्द फार काळ टिकली नाही. त्यानंतर त्यांनी प्रेम ग्रंथ चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा चित्रपटही फ्लॉप होता.
Social Plugin