Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

साताऱ्यात सहा शिवशाही बसला भीषण आग

 साताऱ्यात सहा शिवशाही बसला भीषण आग

साताऱ्यात एसटी स्टॅंड परिसरात उभ्या असलेल्या सहा शिवशाही बसला भीषण आग लागली.



 

सातारा : साताऱ्यात एसटी स्टॅंड परिसरात उभ्या असलेल्या सहा शिवशाही बसला भीषण आग लागली. या आगीत चार शिवशाही बस जळून खाक झाल्या आहेत. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्नीशमन दलाने ही आग सध्या नियंत्रणात आणली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सहा शिवशाही बसचं मोठं नुकसान झालं आहे. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या बसच्या बाजूला मोठी इमारत आहेयाशिवाय मॉलदेखील जवळ आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती होती. मात्र, प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

एसटी स्टँड हा प्रचंड वर्दळीचा परिसर आहे. या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवासी येत असतात. या स्टँड परिसरात सहा शिवशाही बस गेल्या काही दिवसांपासून उभ्याच होत्या. या बसेसला आज दुपारी अचानक भीषण आग लागली. या आगीचे धुर लांबपर्यंत दिसत होते. ते पाहून अनेक लोक एसटी स्टँड परिसरात दाखल झाले. संपूर्ण शहरात आगीची बातमी पसरली. अनेकांनी आग पाहण्यासाठी गर्दी केली. याशिवाय त्याठिकाणी प्रवाशांचीदेखील गर्दी होती. प्रशासनाने सुरुवातीला प्रवाशी आणि इतर पाहणाऱ्यांना हटकवून तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. प्रशासनाने तातडीने अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.


शॉर्टसर्किट की घातपात?

सहा शिवशाही बस या बस स्टँडच्या एका बाजूला उभ्या होत्या. त्यामुळे कुणीतरी मुद्दामून आग लावण्याचं कृत्य केलं की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली याचा तपास पोलीस करत आहेत. या आगीच्या माध्यमातून कुणाचा घातपात घडवण्याचा कट होता की आणखी दुसरं काही कारण होतं? याचा तपास पोलीस करत आहेत.


एकजण ताब्यात

पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे. परिसरातील नागरिकांकडून घातपाताचा संशय वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, बसच्या आसपास फिरत असलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


सातारा पोलीस काय म्हणाले?

सायंकाळी जवळपास पाच वाजेच्या सुमारास शिवशाही बसेसला आग लागल्याची घटना घडली. एसटी महामंडळ, अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने मोठं नुकसान टळलं. अन्यथा आणखी गाड्यांचं नुकसान झालं असतं”, अशी माहिती सातारा पोलिसांनी दिली.

Ad Code

Responsive Advertisement